Pune : पावसाने केली उमेदवारांची पंचाईत; प्रचारासाठी उरले केवळ 10 दिवस

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केवळ 10 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असून उमेदवारांसाठी एक एक दिवस महत्वाचा आहे. मात्र रोज येणाऱ्या पावसामुळे उमेदवारांची पंचाईत झाली आहे.

_MPC_DIR_MPU_II

बुधवारी (दि. ९) जोरदार पाऊस पडून शहरातील रस्त्यांवर सर्वत्र पावसाचे पाणी साचले. त्यामुळे उमेदवारांना प्रचार आटोपताच घ्यावा लागला. आजही आकाशात ढगांचा गडगडाट सुरु आहे. कोणत्याही क्षणी पाऊस सुरू होण्याची चिन्हे आहेत. एका तासाच्या पावसातच सर्वत्र पाणी तुंबते. वीज जाते, अशावेळी घरोघरी प्रचार कसा करावा? या चितेमध्ये सर्व उमेदवार आहेत. बुधवारी संध्याकाळी राज ठाकरे यांच्या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. पण, मुसळधार पावसामुळे सभा रद्द करावी लागली. त्यामुळे मनसे सैनिकांचा हिरमोड झाला.

येत्या काही दिवसांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, अजित पवार यांच्या जाहीर सभा होणार आहेत. तेव्हा देखील पाऊस कोसळणार की काय, अशी भीती उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे. 19 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजता प्रचार संपणार आहे. 21 ऑक्टोबरला मतदान तर, 24 ऑक्टोबर ला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, हवामान खात्याने आणखी काही दिवस पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.