Moshi: मोशी, डुडुळगावमध्ये विलास लांडे यांचा प्रचाराचा झंझावात

कपबशी चिन्हावर मतदानाचे आवाहन

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा मतदारसंघ सुरक्षित हातात नाही. तरूणांना योग्य दिशा दाखविली जात नाही. त्यांचे आयुष्य उद्‌ध्वस्त होईल, असेच वातावरण तयार केले गेले आहे. हे चित्र बदलण्यासाठी अपक्ष उमेदवार व माजी आमदार विलास लांडे यांच्याशिवाय पर्याय नसल्याचा विश्वास मोशी आणि डुडुळगाव भागातील तरूणाईने आज (शुक्रवारी) व्यक्त केला. लांडे यांनी मोशी, डुडुळगावामध्ये प्रचाराचा झंझावात केला.

भोसरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांनी शुक्रवारी मोशी तसेच डुडुळगाव भागात प्रचार दौरा केला. त्यांच्या या दौऱ्याला तेथील तरूणाईकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या भागातील तरूण-तरूणींनी लांडे यांचे जागोजागी उत्साहात स्वागत केले. पाच वर्षापूर्वी भोसरी मतदारसंघ चुकीच्या लोकांच्या हातात गेला. हा मतदारसंघ आता सुरक्षित हातात नाही. सगळीकडे दहशतीचे वातावरण आहे.

शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात गुंडगिरी वाढली आहे. विद्यार्थीनी शाळा-महाविद्यालयांत सुरक्षितपणे जाऊ शकत नाहीत. अनेक गुंड मुलींचा सतत पाठलाग करत असतात. अशा प्रवृत्तींना कोणाचे पाठबळ आहे, हे संपूर्ण मतदारसंघ जाणून आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आता सुरक्षित करायचा असेल तर बदल करण्याची हीच वेळ आहे. निवडणुकीत कपबशीला मतदान करून हा बदल आम्हीच घडवून आणणार असल्याचा निर्धार या भागातील तरूणाईने व्यक्त केला.

आजची तरूणाई समंजस आणि आपल्या आजूबाजूला काय घडत आहे, याची चांगली जाण असणारी आहे. त्यांना चांगले आणि वाईट यातील फरक लगेच समजते. त्यामुळे गेल्या पाच वर्षांचा काळ कसा होता, हे तरूणाईला वेगळे सांगण्याची मला आवश्यकता नाही. चांगल्या विचारासाठी तरूण आणि तरूणींनी पुढे यावे. आपल्या सुरक्षित आणि चांगल्या भविष्यासाठी तसेच भयमुक्त शाळा, महाविद्यालये आणि भ्रष्टाचार मिटवण्यासाठी निवडणुकीत कपबशीला मतदान करावे, असे आवाहन विलास लांडे यांनी तरूणाईला केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.