Shirur : अमित शाह यांच्या रॅली मार्गावरील दुकानं, हॉटेल्स बंद ठेवण्याचे शिरूर पोलिसांचे आदेश

पोलिसांनी व्यापाऱ्यांना बजावल्या नोटिसा

एमपीसी न्यूज- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज शिरूर शहरात भाजपचे उमेदवार बाबुराव पाचर्णे यांच्या प्रचारार्थ रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीला कोणताही अडथळा होऊ नये यासाठी या मार्गावरील सर्व दुकाने, हॉटेल्स बंद ठेवण्यासाठी पोलिसांनी व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या. मात्र दुकाने बंद ठेवल्यामुळे आपले नुकसान होणार असल्याचे दुकानदारांनी पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी दुकान सुरू ठेवण्यास परवानगी दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज शिरूर शहरात भाजपचे उमेदवार बाबुराव पाचर्णे यांच्या प्रचारार्थ दुपारी साडेतीन ते पाच या वेळेत शिरूर शहरातील पाबळ फाटा ते बी जे कॉर्नर या मार्गावर ही रॅली होणार आहे. या रॅलीला कोणताही अडथळा होऊ नये यासाठी या मार्गावरील सर्व दुकाने, हॉटेल्स बंद ठेवण्यासाठी पोलिसांनी व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या.

मात्र दुकाने बंद ठेवल्यामुळे आपले नुकसान होणार असल्याचे दुकानदारांनी पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी दुकान सुरू ठेवण्यास परवानगी दिली.परंतु या दुकानासमोर कुठलीही वाहने पार्क करू नये अशी सक्त ताकीद दिली..

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like