Lonavala : सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ डाॅ. अमोल कोल्हे यांची मंगळवारी सभा

एमपीसी न्यूज- मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस (आय), स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ शिरूर लोकसभेचे खासदार डाॅ अमोल कोल्हे यांची उद्या, मंगळवारी (दि.15) सायंकाळी साडेपाच वाजता लोणावळा येथे जाहीर सभा होणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे व काँग्रेस तालुका अध्यक्ष बाळासाहेब ढोरे यांनी दिली.

गुरूद्वारा चौक, लोणावळा नगरपरिषदे शेजारी, लोणावळा येथे ही सभा होणार असून या सभेला माजी आमदार कृष्णराव भेगडे, माजी मंत्री मदन बाफना, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, ज्येष्ठ नेते माउली दाभाडे, चंद्रकांत सातकर, मावळ तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, अध्यक्ष एसआरपी रमेश साळवे, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, मावळ तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, अध्यक्ष एसआरपी मावळ बाळासाहेब गायकवाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. डॉ. अमोल कोल्हे उत्तम वक्ते असल्याने ते सत्ताधारी पक्षावर कशाप्रकारे निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.