Bhosari : औषधी गुणधर्मांनी उद्याने विकसित होत असल्याने नागरिकांचे आरोग्य सुधारणार – डॉ. निलेश लोंढे (व्हिडिओ)

भोसरी, 13 ऑक्टोबर – भोसरी परिसरात मागील पाच वर्षांच्या कालावधीत काही उद्याने तयार होत आहेत. तर काही उद्याने नागरिकांसाठी खुली करण्यात येत आहेत. या उद्यानांमध्ये औषधी वनस्पतींची संख्या जास्त असल्याने याचा नागरिकांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होणार आहे. असे मत पर्यावरण प्रेमी डॉ. निलेश लोंढे यांनी व्यक्त केले.

डॉ. निलेश लोंढे म्हणाले, “शहराची लोकसंख्या वाढत आहे. वाढत्या शहरांमध्ये मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध नाहीत. या शहरी वातावरणात उद्याने असणे गरजेचे आहे. खेळायला जागा नसल्याने मुलांचा शारीरिक विकास खुंटतो. यासाठी आमदार महेश लांडगे यांनी विविध स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्याने बनवण्याचे यशस्वी काम केले आहे.

भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये मागील पाच वर्षात काही उद्यानांचे नियोजन झाले आहे. काही उद्यानांचे काम सुरू आहे. तर काही उद्याने नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहेत. ही उद्याने बनवत असताना केवळ विरंगुळा म्हणून उद्यानात न जाता उद्यानातील विविध झाडांचा नागरिकांना फायदा व्हावा, याचा देखील विचार करण्यात आला आहे. उद्यानांमध्ये केवळ जंगली झाडे लावता औषधी गुणधर्म असलेली झाडे लावण्यावर भर देण्यात आला आहे. उद्याने बनवत असताना औषधी गुणधर्मासह पर्यावरणपूरक उद्देश देखील समोर ठेवला आहे. उद्यानाच्या जागेत मोठ्या प्रमाणात पाणी जिरले पाहिजे, ज्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढेल याचाही विचार करण्यात आला असल्याचेही डॉ. लोंढे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.