Pune : भगवद्गीतेवरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद शनिवारी

एमपीसी न्यूज – इंटरनॅशनल गीता फाऊंडेशन ट्रस्ट, अवधूत दत्त पीठम् ( म्हैसूर ) आणि भारतीय विद्या भवन ( पुणे ) या संस्थांच्या वतीने पुण्यात 17 व्या दोन दिवसीय ‘ग्लोबल गीता कॉन्फरन्स’ या भगवद्गीतेवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 19 आणि 20 ऑक्टोबरला ही परिषद भारतीय विद्या भवन येथे होणार आहे.

प्रामुख्याने 17 व्या अध्यायातील श्लोकांचे विवेचन या परिषदेत होणार आहे. याधीच्या परिषदा अमेरिका, इंग्लंड, भारतात झाल्या होत्या.देशातून, देशाबाहेरील एकूण 12 वक्ते परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत.संयोजकांचे प्रतिनिधी डॉ.पी.व्ही. नाथ, सी.एन. गुप्ता, नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली .

देशातून आणि परदेशातून भगवद्गीतेचे अभ्यासक या परिषदेत सहभागी होणार आहेत.भगवदगीतेतील श्लोक ,संदेश यावरील व्याख्याने ,गीतेतील अध्यायांचे सामुहिक पठण अभंग -भजन गायन असे अनेक कार्यक्रम या आंतरराष्ट्रीय परिषदेत होणार आहेत. 19 ऑक्टोबरला सकाळी साडेनऊ वाजता परिषदेचे उद्घाटन न्या. बी. एन. श्रीकृष्ण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे . ११ वाजता होणाऱ्या पहिल्या सत्रात न्या बी एन श्रीकृष्ण गीतेतील श्लोक क्रमांक 1,2,३, (श्रद्धा ) या विषयावर बोलणार आहेत. त्यानंतर डॉ.पी.व्ही.नाथ ,स्वामी जनपद महाराज,डॉ लीना परदेशी,टेरी रान बोलणार आहेत.

२० ऑक्टोबरला डॉ.शैलजा कात्रे ,मैत्रयी चैतन्य, राघवन (बेंगळूरू ),विजयानंद तीर्थ स्वामी ,श्री श्रीकान्थ इत्यादी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.