Pune : संभाजी पूल दुचाकीस्वारांसाठी कायमस्वरूपी खुला

एमपीसी न्यूज- पुणेकरांसाठी आनंदाची बाब म्हणजे संभाजी पूल म्हणजेच लकडी पूल काल, बुधवारपासून दुचाकीस्वारांसाठी कायमस्वरूपी खुला करण्यात आला. याबाबतचा निर्णय पुणे शहर वाहतूक विभागाने घेतला आहे.

१९९४ पासून संभाजी पूल दुचाकीस्वारांसाठी सकाळी आठ ते रात्री साडेनऊ या वेळेत बंद ठेवला जात होता. हा पूल दुचाकींसाठी बंद ठेवण्यात आल्यानंतर त्याचा ताण डेक्कन भागातील वाहतुकीवर पडत असल्याच निदर्शनास आल्यामुळे या भागातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी संभाजी पूल पुन्हा दुचाकीस्वारांसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हा पूल दुचाकीस्वारांसाठी बंद ठेवला जात असल्यामुळे परगावाहून येणाऱ्या दुचाकीस्वारांना या नियमाची माहिती नसल्यामुळे नियमभंग करणारे दुचाकीस्वार पुलाच्या दोन्ही बाजूला थांबलेल्या वाहतूक पोलिसांच्या जाळ्यात सापडायचे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like