_MPC_DIR_MPU_III

Pimple Nilakh : गळफास घेऊन 14 वर्षाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

एमपीसी न्यूज- राहत्या घरात गळफास घेऊन 14 वर्षीय मुलाने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 15) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पिंपळे निलख येथे घडली. आत्महत्येपूर्वी हा विद्यार्थी संगणकावर गेम खेळत असल्याचे निदर्शनास आले आहे . 

_MPC_DIR_MPU_IV

गोपेश महेंद्र पवार (वय 14, रा. जगताप डेअरी, पिंपळे निलख) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपेश हा गणेशखिंड, पुणे येथील केंद्रीय विद्यालयात इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. मंगळवारी सायंकाळी घरातील सर्वजण हॉलमध्ये बसले असताना तो बेडरूममध्ये संगणकावर एकटाच गेम खेळत होता. काही वेळानंतर गोपेशचा मोठा भाऊ त्याला बोलवण्यासाठी गेला असता बेडरूमचा दरवाजा आतून बंद होता. त्याने बराच वेळ दरवाजा ठोठावूनही आतून प्रतिसाद न मिळाल्याने त्याने घरातील इतर सदस्यांना आवाज दिला.

गोपेशचे चुलते सुरेंद्र पवार यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश असता त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी गोपेशला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. गोपेशच्या आत्महत्येचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. मात्र, आत्महत्येपूर्वी गोपेश संगणकावर कोणती गेम खेळत होता, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.