BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : लक्ष्मण जगताप यांना देवांग कोष्टी समाजाचा पाठिंबा

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरातील देवांग कोष्टी समाजाने चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड परिसर देवांग कोष्टी समाज संघटनेचे अध्यक्ष सुरेश तावरे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांना पाठिंब्याचे पत्र दिले. यावेळी संघटनेचे खजिनदार भगवानराव गोडसे, उपाध्यक्ष दत्ता लिपारे, सचिव सुनील ढगे, अशोकराव भुते, सुनील डहाके, भरत आमणे, प्रमोद भागवत, सतीश लिपारे, निलेश जगताप, दत्ता ढगे, अमोल तावरे आदी उपस्थित होते.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड मतदारसंघाचा कायापालट केला आहे. ते कर्तव्यनिष्ठ आमदार आहेत. मतदारसंघाचा विकास व्हावा यासाठी ते सतत काम करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात विकासशील मतदारसंघ म्हणून चिंचवड मतदारसंघाची ओळख निर्माण झाली आहे. या मतदारसंघात देवांग कोष्टी समाजाची मोठी संख्या आहे. मतदारसंघाच्या शास्वत विकासासाठी समाजाने आमदार जगताप यांना निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सुरेश तावरे यांनी सांगितले.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like