Bhosari : भक्ती-शक्ती उड्डाणपूल शहराच्या सौंदर्यात भर घालणार – उत्तम केंदळे (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रवेशद्वारावर भक्ती-शक्ती चौकात भव्य उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. अनेक प्रकारच्या सुविधांनी युक्त असलेला हा पूल शहराच्या सौंदर्यात भर पाडेल, असे मत नगरसेवक उत्तम केंदळे यांनी व्यक्त केले.

भोसरी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी भक्ती-शक्ती चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठोस उपाय योजना केली आहे. सुमारे 90 कोटी रुपये खर्च करून भव्य तीन मजली उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील सहा ते सात महिन्यात हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. निगडी बस टर्मिनस, भक्ती-शक्ती शिल्प समूह, निगडी मेट्रो स्टेशन या परिसरात असल्याने हा उड्डाणपूल शहराच्या सौंदर्यात भर पडेल, असा विश्वास उत्तम केंदळे यांनी व्यक्त केला.

भक्ती-शक्ती उड्डाणपुलामुळे प्राधिकरण ते मोशी हा रस्ता जोडला जाणार आहे. येणाऱ्या व जाणार्‍या वाहनांसाठी स्वतंत्र लेन असणार आहे. पुणे-मुंबई रस्त्यावरील उड्डाणपुलामुळे प्राधिकरणाकडून पुणे व मुंबईकडे जाण्यासाठी स्वतंत्र पूल असणार आहे. उड्डाण पुलाखालून बीआरटी बसमार्ग, वर्तुळाकार रस्ता, वर्तुळाकार रस्त्यामुळे पादचार्‍यांना चौकाच्या कोणत्याही दिशेने येता जाता येणे शक्य आहे. हा उड्डाणपूल सिग्नल फ्री असल्याने पादचारी व वाहनांना येथे थांबावे लागणार नाही. यामुळे वाहनांचे इंधन आणि वाहनचालकांच्या वेळेमध्ये बचत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.