BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : डॉ. डी. वाय.पाटील महाविद्यालयात शनिवारी राष्ट्रस्तरीय अभिरुप न्यायालय

एमपीसी न्यूज – पिंपरीच्या डॉ. डी. वाय.पाटील महाविद्यालयात येत्या शनिवारी (दि. 19) राष्ट्रस्तरीय अभिरुप न्यायालयाचे आयोजन करण्यात आले असून या मध्ये देशभरातील 41 महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी न्यायमूर्ती सुधाकर बी. देशमुख यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती प्राचार्या उज्ज्वला शिंदे यांनी दिली. या कार्यक्रमाचे आयोजन पुणे येथील रणदिवे अ‍ॅन्ड रणदिवे लिगल असोसिएशन आणि डी. वाय. पाटील महाविद्यालय यांच्या वतीने होणार आहे, असे अ‍ॅड अनंत रणदिवे यांनी सांगितले.

HB_POST_END_FTR-A2

.