Nigdi : महिला विकासांतर्गत आयोजित ” SSK सखी दिवाळी फेअर-2019 ” ला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – जानकीदेवी बजाज पुरस्कृत समाजसेवा केंद्र यांच्या वतीने “एस एस के सखी दिवाळी फेअर-2019 ” चे आयोजन करण्यात आले आहे. 80 पेक्षा जास्त स्टॉलच्या या भव्य प्रदर्शनाला शहरवासियांकडून प्रतिसाद मिळत आहे.

या प्रदर्शनाचे उदघाटन प्रमुख पाहुणे उर्मिला पाटील, नंदा साळवे, संगीत कोरबोलू, संगीत हिरापूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्टॉलधारक, ग्राहक, विक्रेते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. हे प्रदर्शन 17 ते 20 ऑक्टोबर पर्यंत चालू राहणार आहे.

दरवर्षी SSK सखी दिवाळी फेअर दिवाळीच्या अगोदर आयोजित करण्यात येतो. यामध्ये एकूण 80 स्टॉलचा समावेश असतो पण यावर्षी 80 पेक्षा जास्त स्टॉल समावेश आहे. या प्रदर्शनामुळे दुर्बल घटकांतील महिलांना आर्थिक विकासाचे अतिशय चांगले माध्यम उपलब्ध झालेले असून त्यांच्या व्यक्तिमत्वात अतिशय चांगला बदल घडून येत आहे. या प्रदर्शनास दरवर्षी भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.