Bhosari : पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचा आमदार महेश लांडगे यांना जाहीर पाठिंबा (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना, ज्योतिबानगर अॅंत्रप्रेन्यूअर्स असोसिएशन, शेलार वस्ती इंडस्ट्रियल सोशल असोसिएशन आदी संघटनांच्या वतीने महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. चिखली येथे झालेल्या बैठकीत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा जाहीर केला.

चिखली येथे झालेल्या लघुउद्योग संघटनेच्या बैठकीसाठी महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, माजी अध्यक्ष नगरसेवक सुरेश म्हेत्रे सचिव जयंत कड ज्योतिबानगर अॅंत्रप्रेन्यूअर्सचे अध्यक्ष टीकाराम शर्मा, शेलार वस्ती इंडस्ट्रियल सोशल असोसिएशनचे अध्यक्ष अमरनाथ उपाध्याय, संचालक प्रवीण लोंढे, अॅड. महेश लोहारे, नवनाथ वायाळ, प्रमोद राणे, नरवडे, कीर्ती शाह, तिवारी, निसार सुतार, सर्व संचालक, सल्लागार, सभासद आणि परिसरातील उद्योजक उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे यांनी भोसरी एमआयडीसी परिसरातील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. पिंपरी-चिंचवड परिसरातील लघु उद्योजकांचा परिसंवाद आमदार महेश लांडगे यांनी घडवून आणला. लघु उद्योजकांच्या अडचणीत लांडगे यांनी वेळोवेळी मदत केली आहे. तसेच भोसरी परिसरातील स्वच्छता, पर्यावरण, सुरक्षा आदी प्रश्नांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. एमआयडीसी, तळवडे, कुदळवाडी परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवले. भूमिगत केबलचे काम सुरू केले. या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आमदार लांडगे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे. भोसरी एमआयडीसी परिसरातील रस्ते आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक पावले उचलली आहेत. यामुळे आमदार महेश लांडगे यांना शहरातील लघुउद्योजक संघटनांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.