Bhosari : चऱ्होलीकरांनो आमदार असताना मी तुमची एक इंच तरी जागा बळकावली का ?- विलास लांडे

एमपीसी न्यूज- भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांनी शुक्रवारी (दि. 18) अजंठानगर, चिखली रोड, घरकुल प्रकल्प तसेच चऱ्होली, वडमुखवाडी आणि चोवीसावाडी परिसरात पदयात्रा आणि रॅली काढून प्रचार केला. या पदयात्रेला आणि रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लांडे यांनी महिलांशी संवाद साधून पाच वर्षांत तुमच्याकडे एकदा तरी आमदार फिरकला का ?, असा सवाल केला. चऱ्होलीत प्रचारादरम्यान प्रत्येक नागरिकाला “मी दहा वर्षे आमदार असताना तुमची एक इंच तरी जमीन बळकावली का?, असा प्रश्न त्यांनी केला. भूलथापा देणाऱ्या आणि जागा बळकावणाऱ्यांना मतदान करू नका. कोणत्याही राजकारण्याला किंवा गुंडप्रवृत्तीच्या लोकांना हप्ता द्यावा लागू नये आणि कोणीतरी जागा बळकावेल ही भीती निघून जावी यासाठी कपबशीला मतदान करा, असे आवाहन लांडे यांनी नागरिकांना केले.

विलास लांडे यांनी सकाळी साडेनऊ वाजता सिद्धीविनायक मंदिरात दर्शन घेऊन अजंठानगर भागातील पदयात्रेला सुरूवात केली. या पदयात्रेत माजी नगरसेवक एकनाथ थोरात, विनायक रणसुभे, चांगदेव कोलते, मनीषा गटकळ, गंगा धेंडे, प्रशांत जाधव, काशिनाथ जगताप, गोफणे, लता पिंपळे, मीना गटकळ, पियू साहा, पुजा कांगळे, कांता धेंडे, अनिल भोसले, विजय धेंडे, दीपक कांबळे, सुखदेव शिंदे, अंजली चौधरी, मनसेचे संतोष यादव, काँग्रेसचे हिरामण खवळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे किसन शेवते यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तसेच मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ही पदयात्रा कस्तुरी मार्केट, अजंठानगर, पत्राशेड बिल्डिंग, दुर्गानगर चौक, त्रिवेणीनगर चौक, स्पाईन रोड, गुरूदत्त सोसायटी, कृष्णानगर, पोलिस लाईन, मथुरा चौक, जिजामाता पार्क, थोरात ऑफिस, बाबा देसाई चौक, फुलेनगर, शिवाजी पार्क, शिवतेजनगर, पूर्णानगर, आरटीओ ऑफिस, एचपी पंप परिसर, हरगुडेवस्ती, पवारवस्ती, गावडेवस्ती, नेबळेवस्ती, चिखली रोड, सुदर्शननगर, गल्ली नंबर 6, हनुमान मंदिर, कोयनानगर, भिमशक्तीनगर, एकदंत सोसायटी, मोरेवस्ती रोड, म्हात्रेवस्ती चौक, पोलाईट बिल्डिंग, स्पाईन रोड मार्गे चिखलीतील घऱकुल प्रकल्पाजवळ पदयात्रेचा समारोप झाला.

लांडे यांनी दुपारी चारनंतर वडमुखवाडी, पद्मावतीनगरी, चोविसावाडी, चऱ्होली फाटा, आझादनगर, दाभाडेवस्ती, वाघेश्वरवाडी, चऱ्होली गावठाण, भोसलेवस्ती, आण्णाभाऊ साठेवस्ती, कोतवालवाडी, काळजेवाडी, ताजणे मळा, साईनगरी या भागात पदयात्रा काढून तेथील नागरिकांशी संवाद केला.  जिथे जातील तिथे विलास लांडे प्रत्येक नागरिकाला मी दहा वर्षे आमदार असताना चऱ्होली भागातील एक इंच तरी जमीन कोणाची बळकावली आहे का?, हा एकच प्रश्न विचारत होते. त्यावर नागरिक नाही, असे उत्तर देत होते. लांडे यांनी भूलथापा देणाऱ्या आणि मतदारसंघाला पाच वर्षे दहशतीखाली ठेवणाऱ्यांना पुन्हा मतदान करू नका, कपबशी चिन्हासमोरील बटन दाबून मतदारसंघातून दहशतीला हद्दपार करा, असे आवाहन नागरिकांना केले.

या भागातील पदयात्रेत मनसेचे भोसरी विधानसभा अध्यक्ष अंकुश तापकीर, अमित तापकीर, मयूर तापकीर, भूषण राणा, ऋषिकेश तापकीर, माऊली तापकीर, प्रभाकर बौले, भानुदास तापकीर, संभाजीमहाराज तापकीर आदी सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.