Bhosari : इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असोसिएशनचा आमदार महेश लांडगे यांना जाहीर पाठिंबा (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असोसिएशन पुणे यांच्या वतीने महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांना जाहीर पाठींबा देण्यात आला आहे. भोसरी एमआयडीसी परिसरात मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच कामगार आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सकारात्मक पावले उचलल्याबद्दल त्यांना पाठींबा जाहीर करण्यात आला असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब दाते यांनी सांगितले.

बाळासाहेब दाते म्हणाले, “महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातील उद्योग विश्वाच्या उभारणीसाठी तसेच कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी मागील पाच वर्षांपासून पाठपुरावा केला आहे. भोसरी एमआयडीसी परिसरात रस्ते, पाणी, वाहतूक व्यवस्था, रोजगार, वीज अशा पायाभूत सुविधा मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

भोसरी एमआयडीसी परिसरातील उद्योग आणि कामगारांच्या समस्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने सरकार दरबारी पाठपुरावा केला आहे. पुढील काळात अशाच सक्षम नेतृत्वाची गरज आहे. शहरातील उद्योगविश्व आमदार महेश लांडगे यांच्याकडून आणखी सक्रीय कामाची अपेक्षा करीत आहे. आमदार महेश लांडगे यांच्या उमेदवारीमुळे कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यासाठी असोसिएशनच्या वतीने त्यांना पाठींबा देण्यात येत आहे, असेही दाते यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.