Pune: जिल्ह्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 52.03 टक्के मतदान

एमपीसी न्यूज- पुणे जिल्ह्यात संध्याकाळी 5 पर्यंत सरासरी 52.03 टक्के मतदान झाले आहे.  शहरी भागात मतदारांचा निरुत्साह दिसून येत आहे. ग्रामीण भागात सरासरी 60 टक्के मतदान झाले आहे.

पुणे जिल्ह्यातील दुपारी तीन पर्यंतची विधानसभा मतदारसंघ निहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे.

जुन्नर – 60.07
आंबेगाव – 63.00
खेड – 61.39
शिरूर – 58.81
दौंड – 61.15
इंदापूर – 74.25
बारामती – 52.20
पुरंदर – 57.60
भोर – 59.65
मावळ – 64.36
चिंचवड – 51.33
पिंपरी – 42.67
भोसरी – 52.52
वडगाव शेरी – 40.55
शिवाजीनगर – 39.20
कोथरूड – 43. 23
खडकवासला – 49.50
पर्वती – 45.07
हडपसर – 48.84
पुणे कॅन्टोन्मेंट – 38.14
कसबा – 36.08

दोन दिवस हजेरी लावणाऱ्या पावसाने आज दांडी मारली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतदान होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून आलेला नाही. आज दुपारी एक वाजेपर्यंत आठही मतदारसंघात मिळून अवघे २३. २१ टक्के मतदान झाले आहे.

निवडणूक आयोग शेवटपर्यंत मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन करीत आहे. 50 टक्केही मतदान होणार की नाही याची शाश्वती नाही. वडगावशेरी, शिवाजीनगर, कसबा पेठ, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट या सर्वच मतदारसंघांत दुपारी 2 वाजत आले तरी निरुत्साह दिसून येत आहे.

हौसिंग सोसायटीमधील मतदार अजूनही मोठ्या संख्येने मतदानाला बाहेर पडल्याचे दिसत नाही. झोपडपट्टीमध्ये राहणारे रहिवाशी दुपारी 4 नंतरच बाहेर पडणार असल्याचे चित्र आहे.

आठही मतदारसंघातील दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे-

कसबा – १८. ५७ टक्के
शिवाजीनगर – २०. ०४ टक्के
वडगावशेरी – २२. ६० टक्के
पर्वती- २४. ०१टक्के
कॅन्टोन्मेंट- १८. ९० टक्के
खडकवासला- २७. ७९ टक्के
हडपसर- २९. १६ टक्के
कोथरूड- २४. ६५ टक्के

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.