Pune : भारतीय विद्या भवनमध्ये रंगली ‘भक्ती संगम ‘ भक्ती गीताची मैफल

एमपीसी न्यूज – ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ भक्ती संगम ‘ या भक्ती गीताच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. या मैफलीला संगीत रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले.केतन अत्रे ,चैत्राली अभ्यंकर यांनी भक्तिगीते सादर केली. तर राजेंद्र हसबनीस (तबला ) ,नरेंद्र चिपळूणकर ( संवादिनी ) ,ओंकार पाटणकर ( की बोर्ड ),उद्धव कुंभार ( तालवाद्य ) यांनी साथसंगत केली . श्रेयस बडवे यांनी निवेदन केले.

जाऊ देवाचिया गावा, तोरा मन दर्पण कहलाये, तुम आशा विश्वास अशी गीते चैत्राली अभ्यंकर यांनी सादर केली. ‘ विष्णु मय जग ‘ हा संत तुकारामांचा अभंग केतन अत्रे यांनी सादर केला. ” सुखके सब साथी, ‘ ग बाई मी विकत घेतला शाम ‘हे गदिमांचे द्वद्वगीत दोघांनी गायले. ‘जगमें सुंदर है दो नाम ‘ या भजन गायनाने अभ्यंकर यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

हा कार्यक्रम विनामूल्य होता. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा ९२ वा कार्यक्रम होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.