Pimpri : घराजवळ निवडणुकीची चर्चा करू नका म्हणणा-या दांपत्याला मारहाण; एकाला अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी विभागातून कोण निवडून येणार, याबाबत चारजण एका महिलेच्या घराजवळ चर्चा करत होते. यामुळे महिलेने आपल्या घराजवळ ही चर्चा करू नये, असे चौघांना सांगितले. यावरून चौघांनी महिलेसह तिच्या पतीला बेदम मारहाण केल्याचा गुन्हा पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 21) रात्री साडेअकराच्या सुमारास भीमनगर भाजी मंडईजवळ घडली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

शीतल सचिन सुर्वे (वय 30, रा. भीमनगर भाजी मंडई जवळ, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, गौतम विष्णू रोकडे (वय 45), प्रवीण भीमराव वडमारे (वय 40), सुनील विष्णू रोकडे (वय 38), संगीता प्रकाश गायकवाड (वय 45, सर्व रा. भीमनगर भाजी मंडई जवळ, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान झाल्यानंतर आरोपी हे फिर्यादी शीतल यांच्या घराजवळ ‘पिंपरी विभागातून कोण निवडून येणार’ याबाबत चर्चा करत होते. शीतल यांनी सर्वांना ‘घराजवळ चर्चा करू नका’ असे सांगितले. याचा राग मनात धरून चौघांनी शीतल यांना शिवीगाळ करत त्यांच्यासोबत झटपट केली. यामध्ये शीतल यांच्या हाताला दुखापत झाली.

याबाबत शीतल यांचे पती सचिन यांनी आरोपींना विचारणा केली. यावरून आरोपींनी संगनमत करून सचिन यांना देखील शिवीगाळ करत हाताने व लोखंडी कोयत्याने मारहाण केली. यामध्ये सचिन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याचे शीतल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलिसांनी आरोपी गौतम याला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.