Pimpri : भूगोल फौंडेशनतर्फे नाणेघाट व जीवधन किल्ला येथे पर्यावरण जनजागरण अभियान

एमपीसी न्यूज- भूगोल फाउंडेशनच्या वतीने संस्थेने निसर्ग सौंदर्याने नटलेल्या जुन्नर तालुक्यातील नाणेघाट व जीवधन किल्ला येथे पर्यावरण संवर्धन व प्लॅस्टिक व कचरामुक्त किल्ला व परिसर अभियान राबविण्यात आले.

वाढते प्रदूषण व त्यामुळे बिघडणारा पर्यावरणाचा समतोल याविषयी जनजागृती, प्रबोधन , आपली वसुंधरा प्रदूषण मुक्त करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली.

या अभियानात पर्यटकांनी टाकलेल्या प्लॅस्टिक बॉटल व इतर कचरा गोळा करून तिथे देखरेख करणारे कर्मचारी याना पर्यावरण रक्षणासाठी येणाऱ्या पर्यटकांना कचरा न करण्याबद्दल सूचना द्याव्यात असे सुचविले.

त्यानंतर जवळच असणाऱ्या सह्याद्रीच्या रांगेतील जीवधन किल्ल्यावर देखील स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सर्पमित्र सुभाष आढारी यांनाही परिसर व किल्ला स्वच्छ ठेवण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना सूचना देण्याची विनंती केली.

ऎतिहासिक वास्तुचे जतन व्हावे या भावनेने ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत भूगोल फाउंडेशनचे व संतनगर मित्र मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विठ्ठल (नाना) वाळूंज, कर्नल तानाजी अरबुज, साहेबराव गावडे, शशिकांत वाडते, निकुंज रेंगे व इतर सहकारी यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.