11th admission news: अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज

एमपीसी न्यूज – अकरावी प्रवेशाच्या नियमित पहिल्या फेरीतील प्रवेशाची गुणवत्ता यादी आज (रविवारी) दुपारी तीन वाजता प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिन मध्ये प्रवेशासाठी मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव दिसणार आहे. तसेच, नियमित प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील महाविद्यालयांचा कट-ऑफाही समजणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील 304 कनिष्ठ महाविद्यालयांमधील एक लाख सहा हजार 775 जागांसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यातील जवळपास सहा हजार 227 विद्यार्थ्यांचे प्रवेश कोट्याअंतर्गत निश्चित झाले आहेत.

आता अकरावी प्रवेशासाठी एक लाख 548 जागा उपलब्ध आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत 98 हजार 946 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील 81 हजार 687 विद्यार्थ्यांचे अर्ज लॉक झाले आहेत. तर 81 हजार 251 विद्यार्थ्यांचे अर्ज व्हेरिफाय केले आहेत. विद्यार्थ्यांना अधिक माहितीसाठी  https://11thadmission.org.in/ या संकेतस्थळावर भेट देता येणार आहे.

विद्याथ्यांची ऑनलाइन नोंदणी, अर्ज भाग एक भरण्याची प्रक्रिया आता थांबविण्यात आलेली आहे. नियमित प्रवेशाची दुसरी फेरी तीन सप्टेंबरनंतर सुरू होणार आहे. त्यात विद्याध्यांना अर्ज भाग 1 व 2 भरणे, अपडेट करणे याची सुविधा उपलब्ध होणार आहे. वेळोवेळी जाहीर करण्यात येणाऱ्या वेळापत्रकानुसार विद्याथ्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.