पर्यावरण संवर्धन समिती बसवणार पिंपरी महापालिकेच्या 12 शाळांना रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा

एमपीसी न्यूज – गतवर्षी पिंपरी-चिंचवड शहरावर ओढवलेले पाणीसंकट पाहता पर्यावरण संवर्धन समितीने  पाणी संवर्धनाचा एक उत्तम उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये संस्थेतर्फे पिंपरी-चिंचवड शहरातील 12 शाळांच्या इमारतीला रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसवणार आहे. त्यानुसार महापालिकेच्या पहिल्या शाळेला शुक्रवारी (दि.17) पहिली यंत्रणा बसविण्याचे काम सुरू झाले आहे.

वाकड येथील भूमकर वस्तीमधील आबाजी भूमकर मनपा शाळेला ही यंत्रणा बसविण्यात आली. यावेळी महापौर नितीन काळजे, शिक्षणमंडळाचे प्रशासन अधिकारी, बी.एस.आवारी, सहाय्यक आयुक्त मिनीनाथ दंडवते, शिवसेनेचे शहर प्रमुख व  नगरसेवक राहुल कलाटे, पर्यावरण संवर्धन समितीचे विकास पाटील व इतर सहकारी, विद्यार्थी, शिक्षक आदी उपस्थित होते.

पर्यावरण संवर्धन समिती सन 2012 पासून पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनासोबत विविध पर्यावरण संवर्धन पूरक उपक्रम यशस्वी पद्धतीने राबवत आहे. शहरात महापालिकेच्या शाळा इमारतीच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी एकत्रित करून शास्त्रोक्त पद्धतीने जमिनीत नेऊन सोडण्याचे कार्य पर्यावरण संवर्धन समिती पुढाकार घेत आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात 12 मनपा शाळांच्या इमारती निवडल्या गेल्या आहेत. पावसाची सरासरी लक्षात घेता, पहिल्या टप्प्यात 250 दशलक्ष लिटर एवढे पाणी जमा करून ते जमिनीत खोलवर नेऊन सोडले जाणार आहे.

या उपक्रमास आवश्यक अंदाजे 12 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे काम फिसर्व इंडिया प्रायवेट ली. या कंपनीने दिलेल्या सीएसआरच्या निधीतून पर्यावरण संवर्धन समिती करणार आहे. या कामाला वाकडच्या आबाजी भूमकर मनपा शाळेपासून सुरुवात झालेली आहे.

"rain

"rain

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.