Pune crime news: मद्यविक्री परवाना मिळवून देण्यासाठी 12 लाख घेतले, तोतया एक्साईज अधिकारी अटकेत

12 lakh taken to get liquor license, fake excise officer arrested.

एमपीसी न्यूज- राज्य उत्पादन शुल्क विभागात अधिकारी असल्याचे भासवून बाप-लेकांनी गावातीलच एका व्यक्तीची मद्य विक्रीचा परवाना मिळवून देण्याच्या बहाण्याने तब्बल बारा लाख रुपयांची फसवणूक केली. हडपसर पोलिसांनी या बाप-लेकांना अटक केली असून कोर्टाने 15 जून पर्यंत त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. 

शुभम नंदेश्वर शहा (वय २८, रा. तरडगाव, जि. सातारा) व वडील नंदेश्वर शहा (वय 58) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी करण संजय खुटाळे (वय ३०, रा. तुकाईदर्शन रोड, हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकाच गावातील रहिवासी आहेत. आरोपी शुभम शहा हा पुण्यात रहात होता. गावी जाताना तो अंगावर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचा गणवेश घालून जायचा. फिर्यादीला त्याने आपण सीमाशुल्क विभागात निरीक्षक असल्याचे सांगितले होते. एकाच गावातील रहिवासी असल्यामुळे फिर्यादीचा देखील त्याच्यावर विश्वास बसला होता.

दरम्यान फिर्यादीला मद्यविक्री करण्यासाठी परवाना काढायचा होता. गावातीलच व्यक्ती असल्यामुळे त्याने शुभमशी संपर्क साधला. शुभमनेही परवाना काढून देण्यासाठी सहमती दर्शवली आणि त्यासाठी वेगेवेगळया ठिकाणी रोख व ऑनलाईन स्वरूपात 12 लाख रूपये घेतले. मात्र, वाईन शॉपचे कोणतेही लायसन्स न देता त्यांची फसवूणक केली. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.