Pune : एनडीए खडकवासला मधून 12 चंदनाची झाडे चोरीला

12 Sandalwood trees were stolen from Khadakwasla NDA.

एमपीसी न्यूज – एनडीए खडकवासला येथून अज्ञात चोरट्यांनी 12 चंदनाची झाडे कापून चोरून नेली आहेत. ही घटना एक ऑगस्ट पासून 21 ऑगस्ट पर्यंतच्या कालावधीत घडली आहे. याबाबत 27 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय मोरे (वय 53, रा. कोपरे, एनडीए रोड, पुणे) यांनी याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोरे हे एनडीए खडकवासला येथे सिक्युरिटी म्हणून नोकरी करतात. एक ऑगस्ट ते 21 ऑगस्ट या कालावधीत एनडीए खडकवासलाच्या प्रतिबंधित क्षेत्रातून विनापरवाना प्रवेश करून 18 हजार रुपये किमतीची 12 चंदनाची झाडे कापून चोरून नेली.

21 ऑगस्ट रोजी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मोरे यांनी याबाबत एनडीएच्या वरिष्ठ अधिका-यांना सांगितले. वरिष्ठांशी चर्चा करून 27 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तमनगर पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.