BNR-HDR-TOP-Mobile

Dehuroad : भरदिवसा मोबाईलचे दुकान फोडून 11 महागडे मोबाईल पळवले

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांनी मोबाईल दुकानाचे शटर उचकटून दुकानातून 1 लाख 46 हजार रुपये किमतीचे 11 नवीन महागडे मोबाईल चोरून नेले. याप्रकरणी गुरुवारी (दि. 24) देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शिंदे वस्ती रावेत येथे गुरुवारी दुपारी अडीच ते तीन या कालावधीत घडली.

हृषीकेश अनिल भोंडवे (वय 29, रा. शिंदे वस्ती, रावेत) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे वस्ती रावेत येथील नर्मदा पॅलेसशेजारी हृषीकेश यांचे अष्टविनायक मोबाईल शॉपी हे दुकान आहे. गुरुवारी दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास त्यांचे दुकान कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातून ओपो व विवो कंपनीचे एकूण 11 नवीन मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 46 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.