Pune : क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे कार्यालयीन कर्मचा-यांसाठी आरोग्य तपासणी मोहीम

एमपीसी न्यूज – क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयात काम करणा-या कर्मचा-यांच्या आरोग्य तपासणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. क्रेडाई पुणे मेट्रो आणि डायग्नोपेन डायग्नोस्टिक्स यांच्या वतीने आज कुमार प्रॉपर्टीजच्या 150 कर्मचा-यांची आरोग्य तपासणी करून या मोहिमेची सुरूवात करण्यात आली. क्रेडाई पुणे मेट्रोच्या सर्व 450 सदस्यांच्या कार्यालयातील कर्मचा-यांची तपासणी या उपक्रमात करण्यात येणार आहे.

क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष मनीष जैन, क्रेडाई पुणे मेट्रोचा कुशल उपक्रम व संस्थेच्या कामगार कल्याण समितीचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ, डायग्नोपेनचे संस्थापक संचालक प्रफुल्ल कोठारी, अशोक पालेशा, कुमार प्रॉपर्टीजचे संचालक हितेश जैन, क्रेडाई पुणे मेट्रोच्या कामगार कल्याण समितीचे सदस्य योगेश भोंगाळे, क्रेडाई पुणे मेट्रोचे महासंचालक डी. के. अभ्यंकर, महाव्यवस्थापक उर्मिला जुल्का, संस्थेचे कामगार कल्याण अधिकारी समीर पारखी, कुमार प्रॉपर्टीजच्या मनुष्यबळ विभागाचे महाव्यवस्थापक सुधाकर जोशी या वेळी उपस्थित होते.

या मोहिमेतील पहिल्या तपासणी कार्यक्रमात बीएमआय इंडेक्स अर्थात उंचीनुसार वजनाची तपासणी, रक्तातील साखरेची तपासणी, ब्लड काऊंट तपासण्या तसेच इतरही काही महत्त्वाच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.