Maval : रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण तर्फे मावळातील 50 गावक-यांना मधुमक्षिका पालन प्रशिक्षण

एमपीसी न्यूज – मावळ ग्रामीण भागात रोजगार निर्मितीकरिता रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणाने मावळातील 50 गावक-यांना मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण 20 ऑक्टोबरला देण्यात आले.

यावेळी रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणचे अध्यक्ष बहार सहा, नवनाथ सिरसाट आणि बोरिवली गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणचे अध्यक्ष बहार सहा यांनी “या उपक्रमामुळे रोजगाराचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. आणि या प्रशिक्षणामुळे गावाची अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होणार आहे. नागरिक मधुमक्षिका पालनासाठी पोषक असलेल्या नैसर्गिक वातावरणाचा उपयोग करू शकतात”.

या उपक्रमामध्ये बी बॉक्सचा पहिला सेट रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणातर्फे देण्यात येणार आहे. अंतर्गत बॅचच्या यशावर आधारित मधमाशीचा बॉक्स देण्यात येईल. प्रत्येक मधमाशी बॉक्समध्ये 30,000 कामगार मधमाश्या, 100 नर आणि 1 राणी मधमाशी असतात. बी बॉक्सच्या काळजीसाठी दिवसाला काही मिनिटे घालवावी लागतात.

उत्पादित मध शेतकर्‍यांकडून परत विकत घेतला जाईल.यामुळे 6 महिन्यांत चांगले उत्पन्न मिळू शकते आणि यासाठीच्या कर्जाला सरकारचा पाठिंबा देखील मिळतो. या उपक्रमाला शेतकऱ्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.