Bhosari: ‘दिवाळी सुट्टीत ‘एमआयडीसी’त पोलीस गस्त वाढवावी’

पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेची पोलिसांकडे मागणी

एमपीसी न्यूज – दिवाळीनिमित्त उद्योग क्षेत्रात आठ दिवस सुट्ट्या आहेत. या काळात कारखाने बंद असणार असून औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मालाच्या चोऱ्या होतात. या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी, अनधिकृत भंगार खरेदी –विक्री दुकानावर कारवाई करावी अशी मागणी पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेने पोलिसांकडे केली आहे.

पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्या नेतृत्वाखालील संघटनेच्या शिष्टमंडळाने सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव यांची भेट घेतली. यावेळी संघटनेचे सचिव जयंत कड, संचालक नवनाथ वायाळ, प्रमोद राणे उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

दिवाळी निमित्त रविवारी (दि.27) पासून उद्योग क्षेत्रात आठ दिवस सुट्ट्या आहेत. या काळात कारखाने बंद असणार आहेत. सुट्यांमध्ये औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात औद्योगिक मालाच्या चोऱ्या होतात. या चोऱ्या रोखण्यासाठी पोलीस गस्त वाढविण्यात यावी. अनधिकृत भंगार खरेदी –विक्री दुकानावर कारवाई करावी, अशी मागणी बेलसरे यांनी केली आहे. दिवाळी सुट्टीच्या काळात आपल्या कारखान्याच्या सुरक्षेची नीट व्यवस्था करण्याचे आवाहन बेलसरे यांनी केले आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव यांनी दिवाळी सुट्टीच्या काळात औद्योगिक क्षेत्रात पोलीस गस्त वाढवण्याचे तसेच अनधिकृत भंगार खरेदी –विक्री दुकानावर कारवाई करण्याचे आश्वासन संघटनेला दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.