Pune : धनुर्विद्या स्पर्धेत सूर्यदत्ता ज्युनिअर कॉलेजमधील यश बारगुजेचे यश

एमपीसी न्यूज -जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या वतीने पुण्यात सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या 19 वर्षाखालील विभागीय धनुर्विद्या स्पर्धेत मुलांच्या गटात सूर्यदत्ता ज्युनियर कॉलेजच्या यश बारगुजे याने द्वितीय क्रमांक मिळवत यश प्राप्त केले.

विभागीय स्पर्धेत यश मिळवल्यानंतर आता राज्यस्तरीय स्पर्धेत पुण्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी यश बारगुजे याला मिळणार आहे. त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया आणि उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, फिटनेस अँड स्पोर्ट डायरेक्टर निशिगंधा पाटील, संकेत नालकर यांनी अभिनंदन केले.

याप्रसंगी बोलताना सूर्यदत्ताचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “विविध क्रीड़ा स्पर्धांमध्ये सूर्यदत्ता संस्थेतील विद्यार्थी सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. या सगळ्या खेळाडूना प्रोत्साहित करण्यासाठी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. खेळामुळे मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहते. सामाजिक भान, सांघिक भावना, नेतृत्व, सहनशीलता आदी गोष्टी मुलांना त्यातून आत्मसात करता येतात. शिस्तीच्या सवयींबरोबरच त्यांना अपयशातून यश मिळवण्याचा विश्वास मिळतो. त्यामुळे ‘सूर्यदत्ता’मध्ये खेळांनाही तितकेच महत्व दिले जाते. फिजिकल डायरेक्टरची एक टीम विद्यार्थ्यांमधील क्रीडागुण विकसित करण्यासाठी मेहनत घेत आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.