Nigdi: संकल्प युवा प्रतिष्ठान आयोजित शिबिरात 121 जणांनी केले रक्तदान

121 people donated blood in the camp organized by Sankalp Youth Foundation in nigdi

एमपीसी न्यूज- निगडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत सेक्टर नंबर 22 येथे संकल्प युवा प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने सोमवारी (दि.1) आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 121 जणांनी केले रक्तदान केले.

या रक्तदान शिबिराचे आयोजन संकल्प युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रबुद्ध लिंबराज कांबळे यांनी केलं होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रांती सामाजिक विकास संघटना, कामगार संघर्ष संघटना, एसएम बॉईज निगडी, छत्रपती साम्राज्य निगडी, श्री युवा प्रतिष्ठान निगडी, साई प्रतिष्ठाण, स्वाभिमानी युवा प्रतिष्ठान, रोशन युवा प्रतिष्ठाण निगडी व इतर सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांचे विशेष सहकार्य लाभले.

प्रभागाचे नगरसेवक सचिन चिखले यांनी या कार्यक्रमाला भेट देऊन रक्तदात्यांचे मनोबल वाढविले. या वेळेस नियाज खान, कुतबुद्दीन होबळे, गोविंद कुऱ्हाडे, गणेश अवघडे, शिवाजी साळवे, संतोष नाटेकर, श्रीनिवास बिरादार, गणेश वाघमारे, सुजित धोत्रे, रमेश धोत्रे, अंजार अन्सारी, अक्षय भापकर, रमेश गायकवाड, संकेत अंकाली, निलेश साळुंखे, प्रीतम बनसोडे, आकाश डोंबे, सतीश कोळी, अंकुश कानवडे, चवडाप्पा तळवार, अमीर पटेल, मोनिकेश चांदे, मोनू पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

या भागात आजपर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नसला तरी या कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक अंतर व स्वच्छतेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.