Vadgaon Maval : अध्यापक महाविद्यालयाची मनशक्ती प्रयोग केंद्रास अभ्यासभेट

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ येथील अध्यापक महाविद्यालयातील बीएड द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या द्वितीय वर्ष अभ्यासक्रम पूर्ततेसाठी नुकतीच मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा या ठिकाणी अभ्यासभेट आयोजित करण्यात आली होती.

या भेटीमध्ये मनशक्ती केंद्रातील जीवन साधक नामदेव फापळे व गीते यांनी बीएड विद्यार्थ्यांना संपूर्ण केंद्राची माहिती देऊन मार्गदर्शन केले. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे बालमानसशास्त्र समजून कसे घ्यावे, ताणतणावाचे व्यवस्थापन कसे करावे, निरोगी आरोग्यासाठी आवश्यक बाबी, भावी शिक्षक म्हणून आवश्यक क्षमता कशा वाढवता येतील, आपल्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारे मार्गदर्शन व समुपदेशन कसे करता येईल व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणते विविध उपाय योजता येतील याविषयीची माहिती देण्यात आली.

तसेच मनशक्ती केंद्रात चालणारे विविध उपक्रम, तेथे उपस्थित असणाऱ्या विविध चाचण्या व मनशक्ती केंद्राची स्वतःची असणारी ग्रंथसंपदा या सर्वांची उपस्थित विद्यार्थ्यांनी सविस्तरपणे माहिती घेतली. यावेळी बीएड विद्यार्थ्यांसोबत विषय शिक्षक डॉ. संदीप गाडेकर व डॉ.अनिता धायगुडे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.