Pune : पाणी जास्त लागते म्हणून साखर कारखानदारी बंद ठेवणे हा उपाय नाही- राजेंद्र पवार

एमपीसी न्यूज – उसाला जास्त पाणी लागते म्हणून साखर कारखानदारी बंद ठेवणे हा उपाय नसल्याचे जलसंपदा विभागाचे सचिव राजेंद्र पवार यांनी आज सांगितले.

औरंगाबाद विभागीय आयुक्त यांनी काही दिवसांपूर्वी मराठवाड्यात उसाला पाणी शक्य नसल्याने केवळ पिण्यासाठी पाणी आरक्षित ठेवले होते. त्यावर बोलताना पवार म्हणाले, “ऊस हे नगदी पीक आहे. त्यापासून शेतकय्रांना चांगले उत्पादन मिळते. ऊस, केळी या पिकांसाठी ठिंबक सिंचन लागू करण्यासाठी कायदा केला आहे. त्यामुळे 70 ते 80 टक्के पाणी वाचणार आहे. शाश्वत पाणी महत्वाचे असून त्याचे योग्य नियोजन करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.

तर, मराठवाड्यात 5 ते 7 टक्के पाणीसाठा असताना पिण्यासाठी पाणी आरक्षित ठेवण्यात आले होते. पश्चिम महाराष्ट्रातही उसाला जास्त पाणी लागत असल्याची आठवण पवार यांनी यावेळी करून दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.