Pune : विकासान्वेष फाउंडेशन’तर्फे पुण्यात उद्यापासून ‘रुरल इंडिया’ वार्षिक परिषद

एमपीसी न्यूज- ‘विकासान्वेष फाउंडेशन’तर्फे पुण्यात ‘रुरल इंडिया ‘ या वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ग्रामीण भारताच्या प्रगतीत उपेक्षितांचा समावेश ‘ या विषयावर परिषदेत चर्चा होणार असून देशभरातील तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, धोरणकर्ते, संशोधक त्यात सहभागी होणार आहेत. पुण्याच्या ‘बाएफ ‘ संस्थेच्या सभागृहात 7 ते 9 नोव्हेंबर रोजी ही परिषद होणार आहे. ‘विकासान्वेष फाउंडेशन ‘ चे संचालक संजीव फणसळकर, सल्लागार अजित कानिटकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

_MPC_DIR_MPU_II

राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ कंटेम्पररी स्टडीजचे संचालक विजय महाजन यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. गिरीश सोहनी (संचालक ,बाएफ), आदिनाथ चव्हाण (संपादक, ऍग्रोवन ) हे मान्यवरही उदघाटन कार्य्रक्रमात उपस्थित राहणार आहेत. परिषदेचे आयोजक असलेले ‘विकासान्वेष फाउंडेशन’ हा टाटा ट्रस्ट्सचा एक सामाजिक उपक्रम आहे .

ग्रामीण भारताशी संबंधित मह्त्वाच्या विषयांवर ‘विकासान्वेष फाउंडेशन ‘ ने वर्षभर केलेले संशोधन या परिषदेत मांडले जाणार आहे. देशभरातील संशोधकांचे संशोधनपर निबंध सादर केले जाणार आहेत. शाश्वत शेतीच्या पद्धती, ग्रामीण भागातील उपजीविका, मुस्लिम समाजाचे उच्च शिक्षणातील कमी प्रमाण, स्थलांतर, ‘विकास आणि प्रसारमाध्यमे ‘अशा अनेक विषयांवर तीन दिवस चर्चा होणार आहे .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.