Pune : केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणाविरोधात शुक्रवारी काँग्रेसचे आंदोलन

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण करणार नेतृत्व

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणाच्या विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शुक्रवारी आंदोलन करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.

अखिल भारतीय काँगेस कमिटीच्या चिटणीस सोनलबेन पटेल, माजी सरचिटणीस मोहन प्रकाश यावेळी उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी (दि. 8) सकाळी फडके हौद चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. नोटबंदी, जीएसटी मुळे देशात मोठी मंदी आहे. तरुणांच्या हाताला काम नाही. छोट्या छोट्या कंपन्या बंद पडत आहेत. मोठ्या कंपन्यांही याचा फटका बसला आहे. लोकांच्या खिशातून मोदी सरकारने पैसा काढून घेतला आहे. शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. या सर्व बाबींचा विचार करून मोदी सरकार विरोधात काँगेस आक्रमक झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.