BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : पदवीधर व शिक्षक मतदार संघ नावनोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी

0

एमपीसी न्यूज – पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात पाच जिल्हे येत आहेत. मतदार नावनोंदणीची तारीख बुधवारी संपली आहे. अनेकांची नावनोंदणी झाली नाही. त्याकरिता पदवीधर व शिक्षक मतदार संघ नावनोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी भाजप नगरसेवक उत्तम केंदळे यांनी केली आहे.

याबाबत पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदार नोंदणीची शेवटची तारीख संपली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघ यामध्ये पुणे, सातारा,सांगली, कोल्हापुर, सोलापुर हे जिल्हे येत आहेत. पदवीधर निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर झाला. त्याच कालावधीत लोकसभा व विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. यामुळे कमी प्रमाणात नावनोंदणी झाली असे आढळून येते.

या निवडणूक आचारसंहितेमुळे मुख्याध्यापक शिक्षक,सरकारी अधिकारी,कर्मचारी दोन्ही निवडणुकीत व्यस्त होते. त्यामध्ये दीपावलीची सुट्टी असल्यामुळे पदवीधर व शिक्षक मतदार नावनोंदणी ज्या प्रमाणात झाली पाहिजे. त्या प्रमाणात झाली नाही. अनेक पदवीधर आणि शिक्षक या निवडणुकी साठी मतदान करण्यापासून वंचित राहतील. त्याकरिता नावनोंदणीसाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी केंदळे यांनी केली आहे.

HB_POST_END_FTR-A2

.