Nigdi : उद्यानासमोर उभी केलेली दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज – उद्यानासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 5) सकाळी दहा ते दुपारी पाच या कालावधीत संभाजीनगर येथील साई गार्डनसमोर घडली.

निलेश रामदास काळोखे (वय 20, रा. देहूगाव) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निलेश यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीची (एम एच 14 / क्यू 1257) ही दुचाकी मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास संभाजी नगर मधील साई उद्यानासमोर उभी केली. लॉक करून उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा चोरून नेली. दुपारी निलेश दुचाकी उभी केलेल्या ठिकाणी आले असता त्यांना त्यांची दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी बराच वेळ शोधाशोध केली मात्र, दुचाकी सापडली नाही. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.