India Corona Update : देशात गेल्या 24 तासांत 12,194 नवे रुग्ण, 92 मृत्यू 

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत देशभरात 12 हजार 194 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून, 92 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 09 लाख 04 हजार 940 एवढी झाली आहे.

आरोग्य मंत्रालाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारी नुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 1 कोटी 06 लाख 11 हजार 731 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील 24 तासांत देशभरात 11 हजार 106 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट 97.31 टक्क्यांवर पोहोचला आहे.

 

सध्याच्या घडीला देशात 1 लाख 37 हजार 567 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 20 कोटी 62 लाख 30 हजार 512 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 6 लाख 97 हजार 114 नमून्यांची तपासणी शनिवारी (दि.13) करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात 92 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 55 हजार 642 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.43 टक्के एवढा आहे‌. देशात आतापर्यंत 82 लाख 63 हजार 858 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.