Pimpri : सीबीएसई नॅशनल ऐरोबिक्स चॅम्पियनशीप 2019 स्पर्धेमध्ये हेवन स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंचे यश

एमपीसी न्यूज- समता इंटरनॅशनल स्कुल आयोजित सीबीएसई नॅशनल ऐरोबिक्स चॅम्पियनशीप 2019 स्पर्धेमध्ये हेवन स्पोर्ट्स क्लबच्या परिजा क्षीरसागर व प्रणित आढाव या दोन खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत यश संपादन केले आहे.

सिटी प्राईड स्कुलची विद्यार्थिनी परिजा क्षीरसागर हिने 14 वर्षाखालील एकेरी महिला गटामध्ये तर आर्मी पब्लिक स्कुलचा विद्यार्थी प्रणित आढाव याने 19 वर्षाखालील एकेरी पुरुष गटामध्ये यश संपादन केले. ही स्पर्धा 10 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील कोकमठाण येथे आयोजित करण्यात आली होती. प्रशिक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक हर्षद कुलकर्णी व क्षितीजा राऊत यांनी मार्गदर्शन केले. हेवन संस्थेच्या संस्थापक अलका तापकीर व चैतन्य कुलकर्णी यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like