Pimpri : जागतिक मूळव्याध दिनानिमित्त मोफत विशेष तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज – डॉ .डी वाय पाटील आयुर्वेद रुग्णालय व संशोधन केंद्र, संत तुकाराम नगर पिंपरी येथे शल्य विभागामार्फत जागतिक मूळव्याध
दिनानिमित्त 11 ते 23 नोव्हेंबर पर्यंत विशेष मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे आयोजन रुग्णालयाच्या शल्य
बाह्यरुग्ण विभाग ओ पी डी क्र -3 मध्ये करण्यात आले असून सकाळी 9 ते दुपारी 4 वा या वेळत हे शिबिर घेण्यात येणार आहे.

या शिबिरात मूळव्याध, भंगदंर, मलावष्टभ, शौचाच्या जागी आग होणे, पू-रक्त, खाज येणे, इ आजारांवर मोफत तपासणी करण्यात येणार आहे .
या शिबिरासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे व या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 9145676083, 7796633666 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन आयुर्वेद महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ. गुणवंत येवला यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.