Pune : ‘रुरल इंडिया ‘ वार्षिक परिषदेत ‘सामाजिक उद्योजकतेचे भवितव्य ‘ विषयावर चर्चा

एमपीसी न्यूज- ‘विकासान्वेष फाउंडेशन ‘च्या ‘रुरल इंडिया ‘ वार्षिक परिषदेत सामाजिक उद्योजकतेचे भवितव्य ( सोशल एंटरप्रायजेस ) या विषयावर चर्चा झाली.

परिसंवादात गिरीश सोहनी ( अध्यक्ष, बाएफ ), सी. शंभू प्रसाद ( ईसीड ईर्मा ), बिक्षम गुज्जा (अॅग श्री, हैदराबाद ), उषा गणेश, अंशू भारतीय, मारुती चापके ( गो फॉर फ्रेश, मुंबई ), अजित कानिटकर ( विकासान्वेश फाऊंडेशन ) सहभागी झाले.

‘सामाजिक उद्योजकता प्रकल्प (सोशल एंटरप्राईझ ) ही व्याख्या प्रत्यक्षात सांगता येत नसली तरी सामाजिक उद्देश ठेऊन नफ्यातील उद्योग चालवणे, हे आव्हान आहे’, असे सी. शंभू प्रसाद यांनी सांगितले.

‘उत्पादन खर्च कमी करून कौशल्य पणाला लावून व्यवसाय करावा लागतो.शेतकऱ्यांना फायदा मिळण्यासाठी अमेझॉन सारख्या कंपन्या सहकार्य करतात”; असे मारुती चापके यांनी सांगितले. बिक्षम गुज्जा म्हणाले, ‘सामाजिक उद्योजकता इतर उद्योजकतेपेक्षा वेगळी दिसणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात हे सामाजिक उद्योग जाणे गरजेचे आहे. त्याची संस्थात्मक, कायदेशीर रचना करणे उपयुक्त ठरेल. अंशू भारतीय म्हणाल्या , ‘ सामाजिक उद्योजकतेकडे स्वतःची कल्पना, व्यवसायाचे मॉडेल असेल तर टिकू शकेल. आजूबाजूचे वातावरण पोषक करावे लागेल.

बाएफ ‘ संस्थेचे अध्यक्ष गिरीश सोहनी म्हणाले, ‘ सामाजिक उद्योग हा मुख्य प्रवाहातील मोठा उद्योग असेल असे नाही, पण, समाजातील योगदान मोठे असू शकते. अशा सामाजिक उद्योजकतेला प्रोत्साहन दिले पाहिजे. ”

‘भारतातील कृषी भवितव्य -सामाजिक उद्योजकतेच्या भारतातील प्रेरणादायक कथा ‘ या पुस्तकाचे प्रकाशन झाले . या पुस्तकात भारतातील विविध राज्यामध्ये काम करीत असलेल्या,कृषी क्षेत्रातील 15 सामाजिक उद्योजकांचा (सोशल इंटरप्रायजेस ) चा परिचय करून देण्यात आला आहे . परिषदेच्या उदघाटन सत्रात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले .

विकासान्वेष फाउंडेशन ‘तर्फे पुण्यात ‘रुरल इंडिया ‘ या वार्षिक परिषदेत ‘ देशभरातील तज्ज्ञ ,स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी ,धोरणकर्ते ,संशोधक त्यात सहभागी झाले. गीतांजय साहू (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ),बिश्वदीप घोष (अर्घ्यम संस्था ),व्ही. विवेकानंदन ,पूर्णेन्दु कावुरी हे मान्यवर परिषदेत सहभागी होते.

परिषदेतील विविध विषयांवरील चर्चासत्रात दिना जीजीभॉय(फाउंडेशन फॉर इक्विटी अँड वेल बीइंग ),डॉ शर्वरी शुक्ला (सिम्बायोसिस स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ),सरस्वती पद्मनाभन (टाटा ट्रस्टस ) डॉ अन्वर जाफरी, अमीर उल्लाह खान, अशोक दलवाई (रेनफेड एग्रीकल्चर ऍथॉरिटी, केंद्रीय कृषी मंत्रालय ), श्रीजित मिश्रा हे मान्यवर सहभागी झाले .

ग्रामीण भारताशी संबंधित मह्त्वाच्या विषयांवर ‘विकासान्वेष फाउंडेशन ‘ ने वर्षभर केलेले संशोधन या परिषदेत मांडले . देशभरातील संशोधकांचे संशोधनपर निबंध सादर केले . शाश्वत शेतीच्या पद्धती ,ग्रामीण भागातील उपजीविका ,मुस्लिम समाजाचे उच्च शिक्षणातील कमी प्रमाण ,स्थलांतर ,’विकास आणि प्रसारमाध्यमे ‘अशा अनेक विषयांवर तीन दिवस चर्चा झाली . सामाजिक उद्योजकतेवरील चर्चा ७ नोव्हेंबर रोजी झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.