Bhosari : जागतिक मधुमेह दिनानिमित्त डायबेटीस फेस्टीवल

एमपीसी न्यूज – डॉ. गायकवाड डायबेटीस सेंटर आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी 2 यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मधुमेह दिनानिमित्त डायबेटीस फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मधुमेहासंबंधित वेगवेगळ्या तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. हे शिबिर गुरुवारी (दि. 14) सकाळी नऊ ते एक या वेळेत भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे होणार आहे. हे शिबिर सर्वांसाठी मोफत आहे.

मधुमेह विजेता पुरस्कार वितरण यावेळी करण्यात येणार आहे. हा पुरस्कार भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ओमप्रकाश पेठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मधुमेह तज्ञ डॉ. अनु गायकवाड यांचे ‘मधुमेह कौटुंबिक समस्या’ या विषयावर तर ज्येष्ठ व्याख्याते डॉ. दत्त कोहिनकर यांचे ‘तणावमुक्तीतून मधुमेह मुक्ती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

14 नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो. या दिनानिमित्त तीन हजार रुपयांपर्यंतच्या तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. रक्तशर्करा तपासणी, डोळे तपासणी, पायांच्या नसांची तपासणी, रक्तदाब आणि हृदयाची तपासणी, बीएमआय, बॉडी फॅट अॅनालायझर, बोन डेन्सिटी टेस्ट या तपासण्या केल्या जाणार आहेत. तसेच डायबेटिक फूटवेअर माहिती आणि मधुमेह माहितीपार पुस्तिका यावेळी वाटप करण्यात येणार आहे. मधुमेह मुक्तीसाठी व्यायामाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

तपासणी शिबिरासाठी डॉ. गायकवाड डायबेटीस सेंटर भोसरी येथील डॉ. बाळासाहेब सोनवणे (9689908543), सोनू गव्हाणे (9970443229), दशरथ चौधरी (9552642826) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.