BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : योगीराज हॉलमध्ये रविवारी खवय्यांसाठी इडली महोत्सव !

एमपीसी न्यूज- अस्सल दक्षिणात्य पदार्थांची चव चाखण्याची संधी खवय्ये मंडळींना मिळणार आहे. निमित्त आहे राव कॉलनी मधील योगीराज हॉलमध्ये आयोजित होणाऱ्या इडली फेस्टिवलचे. हा इडली फेस्टिवल येत्या रविवारी (दि. 17) सकाळी 8 ते 11 या वेळेत होणार असल्याची माहिती महोत्सवाचे आयोजक आशिष पाठक यांनी दिली आहे.

या महोत्सवात मसाला इडली, शेजवान इडली, पालक इडली, टोमॅटो लसूण इडली, तट्टे इडली, कांचीपुरम इडली, दही इडली असे इडलीचे सात प्रकार चाखायला मिळणार आहेत. चटणीचे दोन प्रकार, चटणी पुडी, गरमा गरम वाफाळलेले सांबार, मद्रास कॉफी, चहा असा मस्त बेत असणार आहे.
सोबतीला दाक्षिणात्य संगीत, आनंदी उत्साही वातावरण आणि बरंच काही अनुभवायला मिळणार आहे. त्याशिवाय याच्या सोबतीने इडली आख्यानामधून इडली या पदार्थाचा इतिहास ऐकायला देखील मिळणार आहे. पुणे जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारचा इडली महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे.

या महोत्सवासाठी मर्यादित प्रवेश असून प्रवेशिका 14, 15 व 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 6 या वेळेत योगीराज हॉल येथे उपलब्ध करण्यात आल्या आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क- 9371016032, 9011924853 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A2

.