Moshi : लेबर कॅम्पमध्ये डेंग्यू सदृश्य अळ्या, ‘बिल्डर’कडून 25 हजाराचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील मोशी बो-हाडेवाडी येथील प्रिन्सविले या बांधकाम व्यावसायिकाच्या लेबर कॅम्प परिसरात डेंग्यू सदृश्य अळ्या निदर्शनास आल्या आहेत. त्यावर महापालिकेतर्फे आवश्यक फवारणी करण्यात आली. तसेच बांधकाम व्यावसायिकाकडून पंचवीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

डेंग्यू डास उत्पत्तीच्या ठिकाणी फवारणी व आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी दिल्या आहेत. डेंग्यू डास उत्पत्तीच्या ठिकाणांची तपासणी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या पथकाने केलेल्या पाहणीत मोशी बो-हाडेवाडी येथील प्रिन्सविले या बांधकाम व्यावसायिकाच्या लेबर कॅम्प परिसरात डेंग्यू सदृश्य आळ्या निदर्शनास आल्याने त्यावर आवश्यक फवारणी करण्यात आली. पंचवीस हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली.

क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी बी.बी.कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक आर.एम. भोसले, आरोग्य निरीक्षक व्ही.के. दवाळे, राजेंद्र उज्जैनवाल, वैभव कांचन गौडार, सचिन जाधव, संपत भोईटे यांच्या पथकामार्फत कारवाई करण्यात आली.

डास नियंत्रण, जनजागृती मोहिम हाती घेण्यात आली आहे. लेबर कॅम्प अथवा बांधकामाच्या ठिकाणी पेस्ट कंट्रोल करून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन महपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.