Chakan : काचेच्या बाटलीने तरुणावर हल्ला ; एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज- पत्नीला आणण्यासाठी पायी जात असलेल्या सव्वीस वर्षीय तरुणावर दुचाकीवरून भरधाव आलेल्या अज्ञात व्यक्तीने हातातील काचेच्या बाटलीने जीवघेणा हल्ला केला. ही घटना पुणे – नाशिक महामार्गावरील वाकी बुद्रुक ( ता. खेड ) गावच्या हद्दीतील राजरत्न हॉटेलच्या पाठीमागील प्रवेशद्वाराजवळ मंगळवारी ( दि. 12 ) रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान घडली. या हल्ल्यानंतर घटनास्थळावरून गायब झालेल्या अज्ञात इसमा विरुद्ध येथील पोलिसांनी बुधवारी ( दि. 13 ) गुन्हा दाखल केला आहे.

विशाल विलास बो-हाडे ( वय – २६ वर्षे, सध्या रा. रामभाऊ टोपे यांची भाड्याची खोली, वाकी बुद्रुक, ता. खेड, मूळ रा. शिनोली, ता. आंबेगाव,) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. विशाल याने याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

येथील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी ( दि. १२ ) रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान विशाल हा त्याची पत्नी ऋतुजा हिला वाकी फाटा येथे आणण्यासाठी पायी जात होता. त्यावेळी राजरत्न हॉटेलच्या पाठीमागुन अंधारातून दुचाकी वरून भरधाव जात असलेल्या अज्ञात इसमाने विशाल याच्या तोंडावर हातातील काचेची बाटली मारल्याने संबंधित तरुण जखमी झाला आहे. या हल्ल्यानंतर अज्ञात इसम तसाच दुचाकीवरून पुढे पसार झाला.चाकण पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.