Pimpri : दुकानासमोर पार्क केलेली मोपेड दुचाकी चोरली

एमपीसी न्यूज – दुकानासमोर सायंकाळच्या सुमारास पार्क केलेली मोपेड दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना अलंकार डेकोरेट खराळवाडी येथे घडली.

सागर गोपाळ सूर्यवंशी (वय 32, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर यांनी त्यांचे मित्र मच्छिंद्र राजू राजपूत यांची एम एच 14 / जी आर 8576 ही मोपेड दुचाकी 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास खराळवाडी येथील अलंकार डेकोरेट या दुकानासमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने 28 हजार रुपये किमतीचे ती दुचाकी चोरून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.