Bhosari : विकासनाना आहेर मित्र परिवार व जाधववाडी नागरिकांतर्फे रविवारी आमदार महेश लांडगे यांचा सत्कार

एमपीसी न्यूज- जाधववाडीच्या नागरिकांतर्फे व विकासनाना आहेर मित्र परिवाराच्या वतीने आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (दि. 24) जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या निमित्त रक्तदान शिबिर, वृक्षारोपण अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती विकास आहेर यांनी दिली आहे. हा कार्यक्रम आहेरवाडी -जाधववाडी मुख्य चौकात होणार आहे.

सकाळी १० वाजता रक्तदान शिबिर होणार असून या शिबिरात सहभागी झालेल्या रक्तदात्यास रोप वाटप करण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार असून संध्याकाळी शैलेश लोखंडे प्रस्तुत मराठमोळा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचा जास्तीतजास्त नागरिकांनी उपस्तित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.