Talegav dabhade : तळेगावात पसरली फायर हेअरकटची आग !

एमपीसी न्यूज- हल्ली सोशल मीडियावर फायर हेअरकटचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मुबंईतील सलून पाठोपाठ तळेगाव दाभाडे येथील जी-स्पिरिट सलूनने देखील ‘फायर हेअरकट’ची सेवा सुरू केली आहे. त्यामुळे जगभरातील हेअरकटचा नवा ट्रेंड तळेगावात देखील सुरु झाला आहे.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर फायर हेअरकटचा व्हिडीओ व्हायरल झाला. लंडनमधील एका सलूनने असा फायर हेअरकटचा व्हिडीओ पहिल्यांदा नेटवर टाकला. पाहता- पाहता या हेअरकटने सगळ्यांवर मोहिनी घातली. मुंबईमधील नामवंत सलूनने याची री ओढत ही सेवा ग्राहकांना पुरवण्यास सुरुवात केली. आता हे लोण तळेगाव दाभाडे सारख्या छोट्या शहरात देखील पोचले आहे.

तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या बॅलाडोर कॉम्प्लेक्समधील जी-स्पिरिट सलूनमध्ये असा फायर हेअरकट उपलब्ध झाला आहे. “जी-स्पिरिट सलून” शिंदे कुटुंबाचा हा गेल्या पाच पिढ्यांचा पारंपरिक व्यवसाय नेटाने पुढे नेणाऱ्या 22 वर्षाच्या गौरव शिंदे याने हा नवा ट्रेंड प्रथमच तळेगावमध्ये आणला आहे.

गौरवचे आजोबा वसंतराव शिंदे 1940 ते 1990 च्या काळातील केशकर्तनकार होते. ते शीघ्रकवी म्हणूनही तळेगाव परिसरात परिचित होते. गौरवचे वडील चंद्रशेखर शिंदे यांनी सलूनचा व्यवसाय पुढे सुरू ठेवला. सोशल मीडियाचा बोलबाला जसजसा वाढत गेला आणि यू-ट्यूब वरील व्हिडीओजने तो व्यापला तसा फॅशन ट्रेंड्सने जगभरात धूम केली. हाच धागा धरून गौरवने आपल्या समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला नवा लूक दिला आहे.

फायर हेअरकट नक्की आहे तरी काय ?

डोक्यावरचे केस मागे वळवायचे, त्यावर कुलकूल लिक्विड पसरवायचे आणि मग ओल्या केसांवर आग लावायची ! अरे बापरे, पण काळजी करू नका, साधा चटकाही नाही बसणार आणि मृत झालेले केस गायब, याबाबत गौरव म्हणतो की या फायर हेअरस्टाईलचा कोणी घरी संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय वापर करू नये. आत्तापर्यंत आम्ही केलेल्या एकाही ग्राहकाने याबद्दल तक्रार केलेली नाही

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.