Pimpri : महापालिकेतर्फे सुजीतकुमार नाईक यांना सदनिकेचा ताबा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील अनाथ पती किंवा पत्नी यांना झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत सदनिका वाटप करण्यास महापालिका सभेने मान्यता दिल्याने त्यानुसार सुजीतकुमार नाईक या अनाथ व्यक्तीने कागदपत्रांची पूर्तता केल्याने त्यांना सदनिकेची चावी देऊन सदनिकेचा ताबा देण्यात आला.

महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते सदनिकेची चावी देण्यात आली. यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, प्राधिकरणचे अध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसदस्य नामदेव ढाके, संतोष कांबळे, बाबू नायर, मोरेश्वर शेडगे, हर्षल ढोरे, नगरसदस्या शारदा सोनवणे, अनुराधा गोरखे, माजी नगरसदस्य भीमा बोबडे, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

मनपा हद्दीतील अनाथ पती किंवा पत्नी यांना BSUP अंतर्गत सदनिका वाटप करण्याचा ठराव महापालिका सभेने 6 जून 2019 रोजी केला होता. त्यानुसार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मनपा हद्दीतील अनाथ पती किंवा पत्नी यांना BSUP अंतर्गत एकूण सदनिका संख्येच्या 1 % सदनिका राखीव ठेवण्याचे आदेश निर्गमित केले होते.

या अंतर्गत सुजितकुमार नाईक यांनी कागदपत्राची पूर्तता केल्याने अजंठानगर या झोपडपट्टी पुनर्वसनाच्या ठिकाणी विकसित करण्यात आलेल्या अशोका सोसायटीतील इमारत क्रमांक 13 मधील सदनिका क्रमांक 513 चा ताबा आज देण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like