Pimpri: महापालिकेचे ‘स्वच्छथॉन’ अभियानाचे पुरस्कार जाहीर, गणेश बोरा यांना प्रथम क्रमांक

एमपीसी न्यूज – स्वच्छ भारत अभियानात व्यापक स्वरुपात नागरिकांचा व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग व्हावा या हेतूने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान स्वच्छथॉन’ स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. ग्रीनीश ओरा सोल्युशनचे गणेश बोरा यांनी कचरा कमी करण्यासाठी राबविलेल्या ‘कचर्‍यापासून डिस्पोजेबल डिनरवेअर’ या प्रकल्पाला प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे. तर, रोटरी क्लबचे संदीप बिस्वास यांच्या ‘टाकाऊ कच-यापासून बायो एंझाइम’ या प्रकल्पाला द्वितीय क्रमांक जाहीर झाला आहे.

याबाबतची माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के.अनिल रॉय यांनी दिली. स्वच्छ सर्वेक्षण 2020 शहरांमध्ये सुरु झाले आहे. या सर्वेक्षणाचा प्रमुख हेतू आहे की, व्यापक स्वरुपात नागरिकांचा व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग स्वच्छ भारत अभियानामध्ये घेणे. याकरिता त्यांच्यामध्ये माहिती, शिक्षण व संवादाद्वारे त्यांच्या वर्तनातील बदल घडवणे. याकरिता पिंपरी-चिंचवड महापालिकेचे क्षेत्रामधील सर्व नागरीक, एनजीओ, गृहनिर्माण संस्था, असोसिएशन, शाळा, कॉलेज यांना सहभागी होण्याकरीता आवाहन करण्यात आलेले होते.

जानेवारी 2019 पासून राबवित असलेल्या स्वच्छता विषयक कार्यक्रमांची महापालिकेने मागविली होती. यामध्ये कचरा व्यवस्थापन, पाण्याचा पुनर्वापर इत्यादीचे फोटोसह तपशील अहवाल ईमेल आयडीवर 15 नोव्हेंबरपर्यंत मागविण्यात आलेले होते. यापैकी प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरातील नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यात ग्रीनीश ओरा सोल्युशनतर्फे गणेश बोरा यांनी पीसीएमसी आधारित स्टार्टअप शहराला नाविन्यपूर्ण सेवेद्वारे कचर्‍यापासून डिस्पोजेबल डिनरवेअर तयार करणेबाबत प्रकल्प राबवित आहे. त्यासाठी त्यांना प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक रोटरी क्लबचे संदिप बिस्वास यांनी टाकाऊ कच-यापासून बायो एंझाइम या प्रकल्पासाठी सर्वोत्तम नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.