Pimpri : नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पाठपुराव्याने पिंपरीगावात विविध विकासकामांना सुरुवात

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच पिंपरी प्रभाग क्रमांक 21 मध्ये रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यास सुरुवात झाली आहे. पिंपरी प्रभागाचे नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पाठपुराव्यानंतर महापालिका प्रशासन तातडीने कामाला लागले आहे.

नगरसेवक वाघेरे यांनी प्रत्यक्ष संबंधित अधिकारी व त्यांचे सहायक अधिकारी यांच्या समवेत प्रभागाची पाहणी केली. प्रभागात बंद पडलेल्या 43 एलईडी विद्युत दिव्यांची दुरुस्ती करण्यात आली. तपोवन मंदिर रोड ते अशोक थिएटर भागातील अनेक दिवसांपासून रखडलेली पाण्याची ग्रॅविटी लाईन टाकण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. प्रभागात नवीन पेव्हिंग ब्लॉक बसविले जात आहेत. प्रभागातील नवमहाराष्ट्र विद्यालय, ड प्रभाग शाळा व अनसूया नामदेव वाघेरे शाळेच्या क्रीडांगण दुरुस्तीचे काम तसेच मनपाचे विद्यानिकेतन प्राथमिक शाळेतील रंगरंगोटी करण्याचे ही काम वाघेरे यांच्या पाठपुराव्यामुळे सुरू करण्यात आले आहे.

प्रभागातील नादुरुस्त रस्त्यांची तसेच रस्त्यावरील खड्ड्यांचीही डागडुजी करण्यात आली आहे. प्रभागातील शिवाजी महाराज पुतळा ते जिजामाता हॉस्पिटल, तपोवन मंदिर रोड ते अशोक थिएटर, वाघेरे पार्क, गणेश हॉटेल ते अशोक थिएटर, शनिमंदिर ते शास्त्री गार्डन, ग्रीन पार्क हॉटेल समोरील रस्ता, डेअरी फार्म ते रेजिस्टर ऑफिस, नंदकुमार जाधव गार्डन समोरील रस्ता, प्रश्वास सोसायटी समोरील रस्ता, ज्ञानेश्वर नगरी येथे स्टॉर्म वॉटर लाईन, ड्रेनेज लाईन, पिण्याच्या पाण्याची लाईन टाकण्याचे काम तर माळी आळी, जाधव कॉलनी, वैष्णव देवी मंदिर परिसर, शास्त्री गार्डन मागील रस्ता ते गेलार्ड चौक, सी-ब्लॉक 9 व 10, ओबाडा धर्म शाळा बालामल चाळ, समृद्धी हॉटेल ते पिंपळेसौदागर ब्रिज, न्हावी आळी ते कापसे आळी, शिंदे आळी, वाघेरे आळी, कापसे आळी, पवनेश्वर मंदिर परिसर अशा प्रभागातील अनेक ठिकाणी कॉंक्रीटीकरणाची नियोजित कामे करण्यात येणार आहेत.

वैभवनगर ते काळेवाडी ब्रिज येथील 15 मीटर रस्ता, अभिमन्यू चौक ते वैभवनगर 18 मीटर रस्ता, जनसंपर्क कार्यालय ते अभिमन्यू चौक 18 मीटर रस्ता, अशोक थिएटर ते बालगोपाळ शाळेपर्यंतचा 12 मीटर रस्ता तसेच वाघेरे पार्क ते हेमू कलानी परिसर, जायका हॉटेल ते साई चौक पर्यंतचा रस्ता विकसित करण्याचे काम, रस्त्याच्या कडेने फुटपाथ विकसित करणे. तर आवश्यक त्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. प्रभागातील भैरवनाथ मंदिर व छञपती शिवाजी महाराज पुतळा तसेच मनपा शाळांतील किरकोळ दुरुस्त्या व रंगरंगोटीची कामे पूर्ण करण्याच्या सूचना नगरसेवक वाघेरे यांनी अधिका-यांना दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.