BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : अन्न व औषध प्रशासनाकडून साडेतीन लाखांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा

0

एमपीसी न्यूज – अन्न व औषध प्रशासन विभागाने मेदनकरवाडी आळंदी फाटा येथून 3 लाख 40 हजार 935 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. 28) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रंजन बजानंद गिरी (रा. बालाजी नगर, चाकण), अंकुश गुप्ता (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी वंदना विठ्ठलराव रुपनवर (वय 36) यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्यात गुटखा पान मसाला यांचे उत्पादन, साठा, वितरण व वाहतूक करण्यावर बंदी आहे. या आदेशाचे उल्लंघन करून आरोपींनी त्यांच्या ताब्यात तीन लाख 40 हजार 935 रुपये किमतीचा गुटका बाळगला. अन्न व औषध प्रशासन विभागाला याबाबत माहिती मिळाली असता, पोलिसांच्या मदतीने त्यांनी हा गुटका जप्त केला. तसेच दोघांवर गुन्हा दाखल केला. आहे चाकण पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3